भाजपा पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी


सावद्यात आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता : संघटन ही पक्षाची ताकद ; पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या मागे खंबीरपणे उभे रहा : अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील

सावदा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक शनिवारी सायंकाळी सावद्यात झाली. बैठकीच्या व्यासपीठावर सावदा पालिकेतील भाजपाच्या नगराध्यक्षा अनिता येवले व भाजपा नगरसेवक-नगरसेविका यांनी उपस्थिती दिल्याने सावद्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी पालिका निवडणुकीत सावदा पालिकेत राजकीय समीकरण बदलण्याची या निमित्ताने शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, संघटन ही पक्षाची ताकद असून आगामी निवडणुकीत पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या मागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील यांनी यावेळी केले.

व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश नागराज पाटील, बाजार समिती सदस्य पंकज येवले, उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, प्रा.सुनील नेवे, राष्ट्रवादी गटनेता फिरोज पठाण, फैजपूर नगरसेवक कुर्बान शेख, जिल्हा किसान सेल अध्यक्ष सोपान पाटील, अरविंद मानकरी, नीळकंठ चौधरी, प्रकाश पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, प्रमोद रझोतकर, प्रणीत महाजन, मयूर पाटील, कुशल जावळे, जगदीश बढे, अजय भारंबे, जयश्री नेहेते, लीना चौधरी, शबाना चौधरी, मीनाक्षी कोल्हे, विजया जावले, सागीरा बी.सैय्यद तूकडू, नंदाबाई लोखंडे, रेखा वानखेडे, कल्पना ठोसरे, राजेश वानखेडे, सिद्धार्थ बडगे, सै.अजगर, सतीश बेंडाळे, से.अनिस, सिद्धार्थ बडगे, तालुका सरचिटणीस वाय.डी.पाटील, शेख हारून यांच्यासह आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !