पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही !


गुलाबराव पाटलांचा भुसावळात इशारा : प्रभाग 20 मध्ये विकासकामांचे लोकार्पण

भुसावळ : भुसावळातील काही प्रवृत्ती अशा आहेत ज्या मुख्याधिकार्‍यांनाही त्रास देत आहेत. कुणी स्वतःला डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही शिवाय आमच्या नादी त्यांनी लागू नये, त्यांचे सर्व रेकॉर्ड खिशात असून नादी लागाल तर त्याचा अंदाज बांधू शकत नाही. अजूनपर्यंत पालकमंत्री काय आहे ते दाखवलेले नाही व ज्या दिवशी दाखवेल त्या दिवशी हे लोक शहरातही दिसणार नाहीत, अशी खोचक टिका कुणाचेही नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी येथे केली. रविवार, 15 रोजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या प्रभागात विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प.चे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, महेंद्रसिंग ठाकूर, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रा.सुनील नेवे, किरण कोलते, अमोल इंगळे, उद्योजक मनोज बियाणी, गिरीश महाजन, पुरूषोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, देवा वाणी, शोभा नेमाडे, राजीव पारीख, संतोष बारसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




भुसावळातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही
पाकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळ शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून 18 वर्षांच्या मुलाच्या हातात कट्टा आला आहे. ही बाब गंभीर असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक लावली असून त्यांच्याशी या विषयावर मी चर्चा करणार असून शहरातील गुन्हेगारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. पोलीस उपअधीक्षकांनाही मी गुन्हेगारांना हद्दपार करण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील येथे म्हणाले. आमदार संजय सावकारे यांचा कुणालाही त्रास नाही, त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !