यावलमधील कालिका पतसंस्थेतील व्यवहाराच्या चौकशीला सुरूवात


यावल : आर्थिक डबघाईला आलेल्या शहरातील श्री कालिका नागरी पतसंस्थेचे अवसायक डी.एफ.तडवी यांनी चौकशीस प्रारंभ केला आहे. यातून आर्थिक जबाबदारी निश्चित होणार असल्याने ठेवीदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्थेची 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 17 अखेरचा प्रशासकीय नोंदीनुसार कर्जदाराचे व्यवहार उशिराने नोंदविणे तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा व संचालक मंडळ सभा इतिवृत्ताबाबत संस्थेच्या नियमितपणे सभा झाल्या किंवा नाही तसेच संस्थेने कलम 101 कामी वकील फी पोटी बरीच रक्कम खर्च केली आहे. त्याबाबत ताळेबंदमध्ये देणे दर्शवले नाही व संस्थेने थकीत कर्जदार यांच्या जंगम मालमत्तेचा लिलाव केला आहे. कर्जदाराच्या घरातील जप्त केलेल्या वस्तू कर्जदारास परत केल्या किंवा काय याची खात्री करता येत नाही. तसेच संस्थेने बेकायदेशीररित्या रोखीने रकमा परत केल्या आहेत वगैरे याबाबत सहकारी संस्थांचे यावलचे उपलेखा परीक्षक डी.व्ही.ठाकूर यांनी 1 मार्च 2017 या कालावधीचा प्रशासकीय अहवाल सादर केला आहे. या प्रशासकीय अहवालाच्या अनुषंगाने कलम 88नुसार प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.

आर्थिक बाबींची अवसायक करणार चौकशी
संस्थेचे विद्यमान चेअरमन पंकज सोनार यांच्याकडून सहाय्यक निबंधकाकडून 19 मार्च 2021 रोजी चौकशी केल्यानुसार सोनार यांच्याकडून पदभार काढून घेत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 त्यामधील नियम 72 (1) नुसार 7 जानेवारी 2020 पासून संस्थेचे अवसायक म्हणून डी. एफ. तडवी यांची नियुक्ती झाली आहे. संस्थेत झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी तत्कालीन संस्थेचे चेअरमन व संचालक यांच्यावर का निश्चित करू नये ? यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 मधील तरतुदीनुसार चौकशी करून संस्थेस झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी निश्चिती करणे आदी आर्थिक बाबीची चौकशी अवसायक तडवी करणार आहेत. पतसंस्थेमधील गैरव्यहाराचा सातत्याने संचालक मंडळाने पाठपुरावा केल्याने अखेर या अपहाराची चौकशी होऊन संचालक ठेवीदारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा संचालक नितीन सोनार, संचालक देवराम कृष्णा राणे, टालू महाजन, सय्यद अखलाकअली यांनी व्यक्त केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !