सासरचा छळ असह्य : 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या


वडगाव कांदळी : सासरचा छळ असह्य झाल्याने नेहा अमोल पवार (22) या विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्म्हत्या केली. या प्रकरणी पतीसह सासू, सासरा, दीर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेचा मार्च 2020 मध्ये विवाह झाल्यानंतर आरोपींनी नेहाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नेहा 19 ऑगस्टला घरातून बेपत्ता झाली होती. शनिवारी 21 तारखेला नेहाचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आढळला. या प्रकरणी नेहाचे वडील संदीप पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अमोल अनंथा पवार, सासरा आनंथा हरिभाऊ पवार, सासू कमल अनंथा पवार, दीर प्रवीण आनंथा पवार, जावु निर्मला प्रवीण पवार, सुप्रिया नितीन पवार, चुलत सासरे भिकाजी हरिभाऊ पवार (सर्व राहणार वडगाव कांदळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार धनवे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !