सत्ता कुणाचीही असो, प्रहारची नाळ गरीब व सर्वसामान्य माणसांशी


अनिल गावंडे : भुसावळात प्रहार संघटनेची आढावा बैठक

भुसावळ : लोकांची सेवा हा आपला पाया असून तो अधिक मजबूत झाला तरच प्रहार मजबूत होईल. त्यासाठी सुरू होणारी राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम मोठा जोर लावत यशस्वी करा. आजवर काम किती केले यापेक्षा प्रहारशी किती लोक जोडले यावरून मोजमाप होणार आहे. लोकांच्या प्रश्नावर आंदोलने हे आपले महत्वाचे अंग आहे त्याची आठवण ठेऊन सत्ता कोणाचीही असो आपली नाळ कायम गरीब, सामान्य माणसाशी ठेवा, असे आवाहन प्रहार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी येथे केले. प्रहार जनशक्ती पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक सोमवारी तेली समाज मंगल कार्यालयात झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, सुधाकर खुमकर, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, अँड.नंदिनी चौधरी, राजेश्री नेवे, सर्व जळगाव जिल्हातील प्रहार तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिल चौधरींमुळे पक्ष बळकट : अविनाश पाटील
अनिल चौधरी यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला बळकटी प्राप्त झाली असून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोने करण्याची संधी असल्याचे मत युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले.

तळा-गाळातील कार्यकर्ता हीच पक्षाची ओळख ः अनिल चौधरी
भुसावळ झालेल्या आढावा बैठकीच्या बाबतीत बोलत असताना प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले की, स्व.बाळासाहेब ठाकरे नंतर जो नेता आवडला असेल त्याच नाव बच्चू कडू. संघटनात्मक बांधणी या विषयांवर मार्गदर्शन केले. तळागळातील कार्यकर्ता हीच प्रहार पक्षाची खरी ताकद आहे. प्रहार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आणि सक्षम व्हावा म्हणून आपला प्रयत्न राहिला पाहिजे.

विविध पदाधिकार्‍यांची नियुक्ती
प्रहार युवती आघाडी जळगाव जिल्हाध्यक्षपदी नंदिनी अनिल चौधरी यांची निवड करण्यात आली तर प्रहार रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे, प्रहार जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, प्रहार जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विलास पांडे, प्रहार शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, प्रहार जळगाव जिल्हा सरचिटणीस शामकांत पाटील, प्रहार यावल तालुकाध्यक्ष सुभाष सोनावणे, प्रहार अमळनेर तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, प्रहार महिला आघाडी शहराध्यक्ष अलिसान बी शेख ईकबाल, प्रहार यावल शहराध्यक्ष तुकाराम बारी, प्रहार भुसावळ शहराध्यक्ष प्रकाश कोळी (खन्ना), चोपडा युवक आघाडी शहराध्यक्ष रुपम पाटील, अमळनेर युवक तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, यावल युवक आघाडी शहराध्यक्ष राहुल कचरे, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष राहुल पवार, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष जयेश चोपडे, यावल सोशल माडिया प्रमुख आसीफ खान, यावल युवक आघाडी शहर उपाध्यक्ष नितीन बारी यांची नियुक्ती प्रसंगी करण्यात आली. सूत्रसंचालन भूषण चौधरी सर यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !