नशिराबाद टोल नाक्यावर जिल्ह्यातील गाड्यांना टोल माफी द्यावी
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची नहींसह लोकप्रतिनिधींकडे मागणी
वरणगाव : नशिराबाद टोल नाक्यावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रकल्प संचालक सिन्हा व टोलचे मॅनेजर शिवदत्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून जिल्ह्यातील वाहन धारकांना टोलमधून माफी देण्याची मागणी करण्यात आली. नहीने जळगाव जिल्ह्यातील लोकल वाहनांना लागणार्या टोलमाफीची मर्यादा 22 किलोमीटर ठरवली असून ती रद्द करून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील वरणगावसह मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, रावेर, जामनेर, बोदवड यासह चाळीसगाव, अमळनेर, भडगाव, पाचोरा, धरणगाव यासह संपूर्ण जिल्ह्यातील वाहनधारकांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देताना वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, भाजयुमोचे सरचिटणीस आकाश निमकर, भाजपाचे शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, विशाल कुंभार उपस्थित होते. निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे यांनाही निवेदन देण्यात आले


