महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 28 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
जळगाव (10 जून 2026) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
यांची होती उपस्थिती
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोलंके यांच्याहस्ते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. सूत्रसंचालन डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भीरूड यांनी केले. यावेळी गोदावरी हेल्थ सिटी अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले.
विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या 28 वर्षांच्या उल्लेखनीय वाटचालीचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव करत विद्यापीठाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा व संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


