जळगाव जिल्ह्यात 16 व 17 रोजी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता


जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरीकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणार्‍या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !