जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन 18 रोजी ऑनलाईन होणार
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन होत आहे. समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसर्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन ऑनलाइन आयोजीत करण्यात आला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
