गाडेगाव शिवारात मित्राचा दोरीने गळा आवळून खून : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : जामनेर तालुक्यातील गाडेगाव परीसरातील एका विहिरीत एका तरूणाचा मृतदेह 8 ऑक्टोबर रोजी आढळला. या तरूणाचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून आरोपी मित्राला गुन्हे शाखेने अटक केली आहे. राहुल पंढरी पवार (24, रा.नेरी बुद्रुक, ता.जामनेर) असे मयत तरूणाचे नाव आहे तर आरोपी समाधान नारायण कुमावत (बेलदार. रा.नेरी, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

खून करून मृतदेह विहिरीत फेकला
गाडेगाव शिवारातील एका विहिरीत 8 ऑक्टोबर रोजी अनोळखी म्हणून एका तरूणाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मयत हा राहुल पंढरी पवार (24, रा.नेरी बुद्रुक, ता.जामनेर) असल्याचे स्पष्ट झाले होते.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर अधीक्षक् रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, हवालदार संदीप सावळे, हवालदार जयंत चौधरी, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, नाईक भगवान पाटील, नाईक नंदलाल पाटील, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, चालक रमेश जाधव आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

दारूच्या बाटल्या ठरल्या तपासाच्या दुवा
मयत तरुण आढळलेल्या घटनास्थळ परीसरात पाण्याच्या , दारुच्या बॉटल तसेच ग्लास आढळले होते. पोलिसांच्या चौकशीत मयत पोलीस भरतीची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मयतासोबत त्याचा मित्र समाधान नारायण कुमावत याचे नाव समोर आले. समाधान कुमावत हा नेरी-जळगाव रोड वरील गाडेगाव येथील हॉटेल शशिप्रभा या ठिकाणी घटनेच्या दिवशी दारु व पाण्याच्या बॉटल तसेच ग्लास पार्सल घेताना सी.सी.टी.व्ही.फुटेजमध्ये दिसून आल्याने तपास पथकास संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केल्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीस जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !