अल्पवयीन बालिकेवर नराधमाचा अत्याचार : भडगाव तालुक्यातील घटना
भडगाव पोलिसात गुन्हा दाखल : आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
भडगाव : तालुक्यातील एका गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 12 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. भडगाव तालुक्यातील एका गावात 11 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. गावातील प्रभाकर कौतीक माळी या तरूणाने 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 8 वाजेच्या त्यांच्या घरात कुणीही नसतांना पीडीत बालिकेला बोलावून घेतले. तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीने कुटुंबियाला सांगितला. याप्रकरणी पीडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपी प्रभाकर कौतीक माळी याला भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलवाडे करीत आहे.

