अल्पवयीन मुलीवर अत्याचार : धरणगाव तालुक्यातील आरोपीला अटक


जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरूणाला धरणगाव पोलिसांनी गुरूवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अटक केली. शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. डी.एन.खडसे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुकाराम माधव बेलदार (२०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

17 वर्षीय मुलीवर बलात्काराचा आरोप
धरणगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडीलांसह राहते. गावातील संशयीत आरोपी तुकाराम माधव बेलदार (२०) याने १७ वर्षीय मुलीला फूस लावून ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पळवून नेत नाशिक येथे नातेवाईकांकडे नेले. तिथे पीडीत मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी गावातील सरपंच यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुरूवार, १४ ऑक्टोबर रोजी तरूणीची वैद्यकीय तपासणी करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले तर संशयीत आरोपी तुकाराम बेलदार या तरूणाला धरणगाव पोलिसांनी सायंकाळी ४ वाजता अटक केली. शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. डी.एन.खडसे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास धरणगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !