जळगावात अवैध बायोडिझेलचा लाखोंचा साठा जप्त


जळगाव : एमआयडीसी हद्दीत अवैधरीत्या बायोडीझेलचा साठा बाळगणा-यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दोन कारवाया करीत लाखो रुपयांचा डिझेल साठा जप्त केलेली शहरात मोठी खळबळ उडाली. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईप्रकरणी पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव यांनी फिर्याद दाखल केली.

या भागात झाल्या कारवाया
पहिल्या कारवाई दरम्यान एमआयडीसी हद्दीतील जी-35 स्टील क्राफ्ट या कंपनीच्या परिसरात आर्या बायोडीजल या नावाने असलेल्या पंपावर अवैध बायोडिझेल साठा आढळून आला. कंपनी मालक राजकुमार रविंद्र महाजन हे असल्याचे कारवाई दरम्यान आढळून आले. या कंपनी परीसरात असलेल्या टाकीत 10 हजार 920 लिटर डीझेलचा 7 लाख 64 हजार 400 रुपये किमतीचा साठा आढळून आला. या प्रकरणी राजकुमार रविंद्र महाजन यांच्याविरुद्ध रितसर कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दुस-या कारवाईत ऑटो नगर भागातील शांती निकेतन बिल्डींगच्या बाजुला असलेल्या एका ट्रकमधे अवैध बायो डीझलचा साठा आढळून आला. या ट्रकमधे अंदाजे 35 लिटर 2450 रुपये किमतीचे डीझेल, 70 हजार रुपये किमतीची डीझेल विक्री करण्याची इलेक्ट्रॉनिक पंप मशिन, दिड लाख रुपये किमतीची बॅटरी व ट्रक असा एकुण 4 लाख 17 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गफ्फार तडवी, पो.ना. मुदस्सर काझी, पो.ना. महेश महाले, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. रविंद्र मोतीराया, पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !