गावठी पिस्टलच्या धाकावर दहशत : रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक


जळगाव : अवैधरीत्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगत परीसरात दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात आली. युनुस सलीम पटेल उर्फ सद्दाम (रा. गेंदालाल मिल) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने युनुस यास गेंदालाल मिल भागातून शिताफीने अटक केली. आरोपीला पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रीतमकुमार पाटील, राहुल पाटील, राहुल बैसाणे आदींनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !