गावठी कट्ट्यासह चॉपरने दहशत : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


यावल : तालुक्यातील अकलुद या गावी हॉटेल राजे परीसरात बेकायदा गावठी कट्टा व चॉपरच्या धाकावर दहशत माजवणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सचिन ऊर्फ दादु हरिष चौधरी (19, रा.तापी नगर भुसावळ) व धिरज केशरसिंग जाधव (26, रा.मोरेश्वर नगर, भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अशोक महाजन, हवालदार लक्षमण पाटील, नाईक श्रीकृष्ण देशमुख, नाईक रणजित जाधव, नाईक किशोर राठोड, विनोद पाटील, ईश्वर पाटील आदींनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !