टीव्ही चोरताना चोरटा अडकला जाळ्यात


चाळीसगाव : तालुक्यातील पिंपरखेड येथे भाडेकरू म्हणून राहणार्‍या एका व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून 17 हजार रुपये किंमतीचे टिव्ही चोरी करताना चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याने त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील कोंडीराम भावडू गोयकर हे कुटूंबासह शेतात वास्तव्यास असून घर त्यांनी संत गोयल या भाडेकरूला राहायला दिलेले आहेत. दरम्यान, घराचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून घरातील 17 हजार रुपये किंमतीची टीसीएल कंपनीची टिव्ही चोरून नेतांना ग्रामस्थांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी ी रात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीला आली. ग्रामस्थांनी सदर चोरट्याला त्याचे नाव विचारले असता गोकुळ हंसराज राठोड (40, रा.सांगवी, ता.चाळीसगाव) असे त्यांनी सांगितले. त्यावर निलेश विष्णू सुर्यवंशी (रा.पिंपरखेड) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गोकुळ हंसराज राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दीपक ठाकूर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !