नर्सिंगचे प्रशिक्षण घेणार्या तरुणीची नशिराबादला गळफास घेत आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगरात 23 वर्षीय तरूणीने रविवार, 17 ऑक्टोबर रोजी राहत्या घरात रात्री 9 वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. नशिराबाद पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्याण लक्ष्मण मिश्राम (23, रा.वर्धा) असे मयत तरुणीचे नाव आहे. मृत्यूपूर्वी तरुणीने सुसाईड नोटही लिहिली आहे.
मृत्यूपूर्वी लिहिली सुसाईड नोट
कल्याणी लक्ष्मण मिश्राम (23, रा.वर्धा) ही तरुणी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण पुर्ण करून जळगाव शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग संदर्भात प्रशिक्षण घेत होती. मुक्तेश्वर नगरातील गणेश वाणी यांच्या घरात भाड्याने ती वास्तव्यास त होती. कल्याणीने रविवार, 17 ऑक्टोबर रोजी रूमवर एकटी असतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी तिने सुसाईड नोट लिहिली. हा प्रकार रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरमालक वाणी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नशिराबाद पोलीसांशी संपर्क साधला. पंचनामा केला असताना सुसाईड नोटदेखील आढळून आली. त्यात तरुणीने म्हटले आहे की, मी माझ्या स्वखुशीने आत्महत्या करीत असून आई-बाबा मला माफ करा, आणि माझा दफनविधी हा मातीत गाडून करावा, मी स्व-खुशीने आत्महत्या करीत आहे, असा सुसाईट नोटमध्ये उल्लेख आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत. घटनास्थळी रवींद्र इधाटे व पोलिस कर्मचार्यांनी पाहणी केली.

