बोदवडची घटना : शेतातील विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा मृत्यू


बोदवड : शेतातील विहिरीत पडल्याने अपंग शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 17 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जामठी रस्त्यावरील शेतात घडली. प्रदीप वसंत सोनोने (42) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. सोनोने हे रविवारी दुपारी तीन वाजता दैनंदिन शेतीच्या कामासाठी आपल्या शेतात बैल गाडी घेऊन गेले मात्र सायंकाळी साडेसहा वाजेनंतरही घरी न आल्याने कुटुंबातील लोकांनी शोध घेण्यासाठी शेत गाठले असता बैल जोडी शेतात मोकळे फिरताना दिसली मात्र प्रदीप दिसत नसल्याने कुटुंबियांनी शेतातील विहिरीत डोकावले असता पांढर्‍या रंगाचे शर्ट आढळून आल्यानंतर प्रदीप सोनोने यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बोदवड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील व दोन लहान भाऊ असा परीवार आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ गणेश वसंत सोनोने यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार गजानन काळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !