जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा शून्यावर


जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट कायम असून गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर गेल्या 24 तासात दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 577 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 770 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 178 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 00
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 00
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !