दोन लाख न आणल्याने विवाहितेचा छळ : पतीसह चौघांविरोधात गुन्हा


जळगाव : माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह चौघांविरोधात गुन्हा
एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शमीना आसीफ खान (20, पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी जळगाव ह.मु. सबजेल पाठीमागे) यांचा विवाह शहरातील आसीफ खान रहेमतुल्ला खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. पती आसीफ खान व त्यांच्या कुटुंबियांनी सुरूवातीला विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान आई-वडीलांची परीस्थिती गरीबीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करून शकत नसल्याचे विवाहितेने सांगितले. याचा राग येवून पती आसीफ खान याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे घरातील सासरे, जेठाणी, दिर यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. सोमवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती आसीफ खान, सासरे रेहेमतुल्ला खान, जेठाणी नमिरा मोहसिन खान, दिर बबलू रेहेमतुल्ला खान (सर्व रा.पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय धनगर करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !