आसोद्यात जुन्या वादातून तरूणाला मारहाण ; चौघांविरोधात गुन्हा


जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे घरासमोर बसलेल्या 25 वर्षीय तरूणाला जुन्या वादातून चार जणांनी लाकडी दांडक्यासह लोखंडी आसारीने बेदम मारहाण केली. तरूणाच्या जबाबावरुन या प्रकरणी सोमवारी चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून मारहाणीचा आरोप
आसोदा येथील शिवाजी चौक कोळीवाड्यात राकेश गिरधर सपकाळे (25) हा तरुण कुटुंबियांसह राहतो. रविवारी राकेश हा रात्री त्याच्या घरासमोर बसलेला असताना मागील भांडणाच्या कारणावरुन गावातीलच मयुर विजय सपकाळे याच्यासह चार जणांनी राकेशला मारहाण केली. यात मयुर याने पट्टीसारखी काहीतरी वस्तू राकेशच्या हातावर मारली, तर वैभव विजय सपकाळे याने लोखंडी दांडक्याने मारहाण केली तर गुरुदास रघुनाथ सपकाळे याने लाथा-बुक्क्यांनी तर भरत उर्फ विशाल अशोक सपकाळे याने राकेशला लोखंडी आसारीने पायावर तसेच मांडीवर मारहाण केली. घटनेत जखमी राकेशच्या तक्रारीवरुन मयुर सपकाळे, वैभव सपकाळे, गुरुदास सपकाळे व भरत उर्फ विशाल सपकाळे (सर्व रा.आसोदा) या चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आाल. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लिलाधर महाजन करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !