धुळ्यातील ब्राऊन शुगर प्रकरण : दोघा आरोपींना अटक


धुळे : शहरातील हॉटेल रेसीडेन्सीजवळ भुसावळातील संशयीताला साडेसात लाख रुपयांच्या ब्राऊन शुगरसह अटक करण्यात आली होती. आरोपीच्या पोलीस चौकशीत दोन संशयीतांची नावे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सय्यद शेरूने मोनी उर्फ मोना चंद्रकांत माळी (33, रा.जमनागिरी रोड) व सादिक मोहंमद अन्सारी (वय 39) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अटकेतील आरोपींची संख्या झाली तीन
मुंबई-आग्रा महामार्गाजवळील हॉटेल रेसीडेन्सीजवळून ब्राऊन शुगरसह सय्यद शेरू सय्यद बुडन (40, मदिना मशिदीजवळ, पंचशीलनगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली होती. आरोपीकडून सात लाख 50 हजारांचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले होते. पोलीस कोठडीत आरोपीने अन्य दोन संशयीतांची नावे सांगितल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख संशयीत सय्यद शेरू पोलीस कोठडीत आहे तसेच मोनी व सादिक यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकातील उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, कर्मचारी श्याम काळे, थोरात, जितेंद्र वाघ, प्रवीण पाटील, राहुल गुंजाळ, गणेश भामरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !