रावेरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध


रावेर : देशात पेट्रोलसह डिझेल, गॅस व खाद्यतेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने त्या निषेधार्थ रावेरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रावेर तालुक्यातील व शहरातील सर्व राष्ट्रवादी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, युवक तालुकाध्यक्ष सचिन रमेश पाटील, कुणाल महाले, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत चौधरी, सिद्धार्थ तायडे, प्रणीत महाजन आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !