पिंप्राळा परीसरात जुगारावर छापा ; चौघे जाळ्यात


28 हजारांचा मुद्देमाल जप्त : रामनंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : पिंप्राळा भागातील सोमानी मार्केटमध्ये जुगार अड्ड्यावर रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून सुमारे 28 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत चौघांना अटक केली तर दोघे सार झाले. रामानंद नगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांना पिंप्राळा परीसरातील सोमानी मार्केटमध्ये आनंद शिंदे यांच्या दुकानात सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहा.पोलीस अधीकक्ष कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप परदेशी, संदीप महाजन, हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळतांना स्वप्निल शिंदे याच्यासह मेहमुद कमरोद्दीन पिंजारी (मास्टर कॉलनी, अशोक किराणाजवळ, जळगाव), प्रवीण प्रभाकर पाटील (गर्जना चौक, पिंप्राळा), समाधान पंढरीनाथ चौधरी (गणपती नगर, पिंप्राळा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिपीयु, मॉनीटर, स्पिकर, माऊस आदी साहित्य, रोख 870 रुपये असा एकूण 28 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !