एस.टी.कर्मचार्‍यांचा संप : रावेरात प्रवाशांनी घेतला खाजगी वाहनांचा आधार


रावेर : प्रलंबित विविध मागण्यांसाठी येथील आगारातील एस.टी.कर्मचार्‍यांनी संयुक्त कृती समितीतर्फे गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. यामुळे आगारातून एकही बस रस्त्यावर धावली नाही. ऐन दिवाळीच्या पूर्वी बस बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अखेर प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. रावेर आगारातील विविध संघटनांचे 350 कर्मचारी सहभागी झाले आहेत. बस आगारातून सुटणार्‍या एकूण 240 फेर्‍या कर्मचार्‍यांच्या उपोषणामुळे बंद असल्याने आगाराचे साडे सहा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. ठाणे, कल्याण व शहापूर या आगाराच्या बस परत जाऊ शकल्या नाहीत. आगारात 54 बस गाड्या उभ्या असल्याची माहिती आगारप्रमुख जी.पी.जंजाळ यांनी दिली. कर्मचार्‍यांच्या उपोषणामुळे बस वाहतूक ठप्प झाल्यानंतर प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !