बदनामीच्या भितीने अल्पवयीन मुलगी बेपत्ता
जळगाव : इन्टाग्रामवर आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्यामुळे बदनामी होईल या भितीने शहरातील एका भागात राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पेालिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बदनामीच्या भीतीने सोडले घर
रामानंदनगर पोलिसांच्या हद्दीत एका भागात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलीचे इन्स्टाग्रामच्या
अकाऊंटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड झाले त्यामुळे बदनामी होईल या भितीने अल्पवयीन मुलगी सोमवार, 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता घरात कुणाला काहीएक न सांगता निघून गेली आहे. उशीरापर्यंत मुलगी घरी पुन्हा परत न आल्याने तिच्या आईने रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय सुध्दा मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

