ट्रॅक्टर उलटले : आंबे वडगावच्या तरुणाचा मृत्यू
पाचोरा : शहराबाहेरील वृंदावन हॉस्पिटलसमोर वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर पलटी झाल्याने आंबे वडगाव येथील तरूण चालकाचा दबुन जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. आकाश शांताराम सोनवणे (25, रा.आंबेवडगाव, ता.पाचोरा) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे
ट्रॅक्टर उलटल्याने तरुणाचा मृत्यू
पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील पवन विजय वाघ यांनी पाचोरा पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली. मयत आकाश शांताराम सोनवणे याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (एम.एच. 19 सी. झेड.8949) वाळू भरून रेल्वे उड्डाण पुलावरून उतारावरून वेगाने आणताना अचानक उलटले व या अपघातात आकाश हा दबला गेला व डोक्यास जबर मार लागल्याने तो मयत झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे करीत आहेत.

