राज्यस्तरीय ‘काव्यललिता’ पुरस्काराने होणार कवयित्री ललिता पाटील सन्मानीत


चाळीसगाव : पुणे येथील तेजभूषण फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. यात खान्देशातून हिरापूर (ता.चाळीसगाव) येथील माहेर असलेल्या व पाचोरा येथील रहिवासी लेखिका, कवयित्री ललिता संजय पाटील यांना राज्यस्तरीय काव्यललिता पुरस्कार जाहीर करण्यात आला. याबाबत निवड पत्र त्यांना संस्थापक अध्यक्षा तेजस्विनी भगीरथ यांनी नुकतेच पाठवले आहे. तेजभूषण फाउंडेशन, वाशीम (महाराष्ट्र राज्य) यांच्या पुणे येथे रविवार, 26 डिसेंबर 2021 रोजी होणार्‍या राज्यस्तरीय संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कारानंतर अभिनंदनाचा वर्षाव
कवयित्री ललिता पाटील ह्या खान्देश साहित्य संघच्या पाचोरा तालुकाध्यक्षा आहेत. तसेच विविध साहित्य संघटनेच्या त्या सक्रिय लेखिका आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्या दोन वेळेस निमंत्रित होत्या. त्यांचे लेख, कविता अनेक मासिके, दर्जेदार अंकात नेहमी प्रकाशित होत असतात. त्यांना काव्य क्षेत्रात अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !