जळगावात भरधाव कारने वृद्धाला उडवले


जळगाव : शहरातील कोर्ट चौकात बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पायी जाणार्‍या वृध्दाला भरधाव कारने धडक दिली. यात वृध्दाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी कार चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शांताराम भिला पाटील (82, रा.सिनेमा गल्ली, भडगाव) असे जखमीचे नाव आहे.

कोर्ट चौकात कारने दिली धडक
शांताराम पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. शांताराम पाटील हे कामाच्या निमित्ताने बुधवारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात कामानिमित्त आले होते. कोर्टातील आपले काम आटोपून कोर्ट चौकात पायी जात असताना भरधाव वेगाने येणार्‍या कार क्रमांक (एम.एच. 21 व्ही.3092) ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शांताराम पाटील यांच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारचालक कार घेवून पसार झाला. याप्रकरणी शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगीता खंडारे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !