अमळनेर शहरातील बेपत्ता बालिकेचा मृतदेह आढळला
अमळनेर : शहरातून बेपत्ता झालेल्या पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह बोरी नदीपात्रातील डोहात तरंगतांना आढळून आला आहे. जोया शेख तैय्यब कुरेशी (वय 5, कुरेशी मोहल्ला, अमळनेर) असे मयत बालिकेचे नाव आहे.
बेपत्ता बालिकेचा अखेर मृतदेह हाती
शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील जोया शेख तैय्यब कुरेशी ही पाच वर्षांची बालिका मंगळवार, 23 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर बोरी नदीपात्रातील डोहात तिचा मृतदेह तरंगताना दिसला. नागरीकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र दिवे, पोलिस उपनिरीक्षक शत्रृघ्न पाटील आणि मिलिंद भामरे यांनी भेट दिली.

