चाळीसगाव शहर पोलिसांकडून पावणेदोन लाखांचा गांजा जप्त : दोघे जाळ्यात
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी दोन वाजता घाट रोड भागातील कोळीवाड्यात एका घरात छापा टाकून एक लाख 66 हजार 650 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गांजा तसेच 58 हजार 770 रुपये किंमतीची रोकडसह अन्य सामान मिळून दोन लाख 25 हजार 855 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी 50 वर्षीय महिलेसह अजय उर्फ राकेश भिकन चौधरी (दोन्ही रा.कोळीवाडा, घाटरोड, चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातील घाट रोड भागातील कोळीवाडा भागात राहणार्या संशयीत आरोपींकडे प्रतिबंधीत गांजा असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी छापा टाकत शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कारवाई केली. आरोपींच्या ताब्यातून 11 किलो 214 ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा, उग्रवास असलेला गांजा तसेच 58 हजार 770 रुपये किंमतीची रोकड, स्टॅपलर, वजनकाटा मिळून दोन लाख 25 हजार 855 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट 1885 चे कलम 8 (क), 20(ब), ळळ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील, नायब तहसीलदार विकास प्रल्हाद लाडवंजारी, सहा.निरीक्षक विशाल टकले, सहा.निरीक्षक विष्णू आव्हाड, सहा.निरीक्षक सागर ढिकले, सहा.निरीक्षक सचिन कापडणीस, उपनिरीक्षक अमोल पवार, हवालदार 2523 अभिमन महादु पाटील, नाईक भगवान अजब उमाळे, सुभाष रमेश घोडेस्वार, नाईक दीपक प्रभाकर पाटील, नाईक विनोद विठ्ठल भोई, कॉन्स्टेबल विनोद तुकाराम खैरनार, कॉन्स्टेबल निलेश हिरालाल पाटील, शिपाई सबा शेख, चालक नाईक नितीन गंगाराम वाल्हे, चालक कॉन्स्टेबल महेश अरविंद बागुल आदींच्या पथकाने केली.
