पाचोरा शहरातील 38 वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू


पाचोरा : पाचोरा शहरातील श्रीराम नगर भागातील ज्ञानेश्वर आनंद गायकवाड (38) यांचा रेल्वेखाली आल्याने अपघाती मृत्यू झाला. शनिवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. मृत गायकवाड हे सिमेंट व्यावसायिक होत. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परीसरातील नागरीकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !