चाळीसगावात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार : आरोपी जाळ्यात


चाळीसगाव : बिस्किटचा पुडा खायला देतो, असे आमिष दाखवून अवघ्या चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शहरात शनिवारी रात्री घडली. या गंभीर घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा
चाळीसगाव शहरातील चार वर्षीय अल्पवयीन मुलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो, असे सांगून चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ नेत बालिकेवर अत्याचार करण्यात आला. शनिवारी रात्री 9 ते 10 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी संशयीत आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (लोंढरे, ता.नांदगाव, जि.नाशिक) या आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम 363, 366 (अ), 376 (एबी) व पोस्को कायदा अंतर्गत 4, 5 (एम), 6, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !