जळगावात शिविगाळ केल्याने तलवार हल्ला : पाच जणांविरोधात गुन्हा


जळगाव : शहरातील वाल्मिक नगरातील कोळी पेठ येथे शिवीगाळ केल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारीत तरूणावर तलवार हल्ला केल्याचा प्रकार शनिवार 27 नोव्हेंबर रेाजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
रवी कमलाकर बाविस्कर (34, रा.वाल्मिक नगर, कोळी पेठ, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण शनिवार, 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील वाल्मिक नगरातून जात असतांना सुरेश पुंडलिक ठाकरे याने थांबवून शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. या कारणावरून सुरेश ठाकरे, शंकर पुंडलिक ठाकरे, गणेश पुंडलिक ठाकरे (रा. वाल्मिक नगर) आणि हर्षल चंद्रकांत सोनवणे (मेस्कोमाता नगर, जळगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर सुरेश ठाकरे आणि शंकर ठाकरे यांनह तलवारने आपल्या डोक्याला आणि हातावर वार करून जखमी केले. याप्रकरणी संशयीत आरोपी सुरेश ठाकरे, शंकर ठाकरे, गणेश ठाकरे आणि हर्षल सोनवणे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या गटातर्फे पुंडलिक ठाकरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रवी कमलाकर बाविस्कर (वाल्मिक नगर) हा शनिवार, 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घरासमोर येवून शिविगाळ करीत असल्याने त्यास जाब विचारल्याने त्याचा राग आल्याने रवी बाविस्कर याने शंकर ठाकरे याला शिवीगाळ करून हातातील लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केली तसेच चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात तक्रार संशयीत आरोपी रवि बाविस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !