तामसवाडीत पिता-पूत्रास मारहाण : आठ जणांविरोधात गुन्हा


पारोळा : शेतातील रस्त्याच्या कारणावरून मुलासह वडीलांना बेदम मारहाण केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून आठ संशयीत आरोपींविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वहिवाटीच्या कारणावरूण मारहाण
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील नवल माणिक पाटील (वय-28) हा तरुण 1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजता तामसवाडी शिवारातील त्याच्या शेतात जात असतांना त्यांच्या शेताच्या शेजारी राहणारे प्रवीण बापू पाटील यांनी शेतातील वहिवाटीच्या कारणावरून नवल पाटील याला मारहाण केली. यावेळी प्रवीण पाटील याच्यासह खंडू भावराव पाटील, पांडूरंग हिरामण पाटील, अनिल मोतीलाल पाटील, वसंत भोजू पाटील, उषाबाई प्रदीप पाटील (तामसवाडी, ता.पारोळा) आणि रवींद्र प्रदीप पाटील (शेरूळ, ता.मालेगाव, जि.नाशिक) यांनी मिळून शेतात नवल पाटील आणि त्यांचे वडील माणिक पाटील यांनी शिवीगाळ करून लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केले होते. यासंदर्भात नवल पाटील यांनी पारोळा न्यायालयात तक्रार दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मारहाण केल्याप्रकरणी संशयीत आरोपींविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विजय भोई करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !