पोहरे गावातून दुचाकी लंपास


चाळीसगाव : तालुक्यातील पोहरे येथून घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ
तालुक्यातील पोहरे येथील रामभाऊ उध्दव माळी (33) यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी (क्र.एम.एच.19 डी.एफ.372) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. रामभाऊ उध्दव माळी यांनी परीसरात आजपावेतो शोधाशोध केली असता 15 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल मिळून न आल्याने मेहुणबारे पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध
इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहा.निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !