भाऊबंदकी उफाळली : पिंप्रीत पुतण्याला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
चाळीसगाव : शेतीचा सामायीक बांध कोरल्याच्या कारणावरून विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पुतण्याला जबर मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील पिंप्री बु.॥ येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल
तालुक्यातील पिंप्री बु.॥ येथील प्रवीण राजेंद्र पाटील (26) यांनी शेतातील सामायीक बांध कोरल्याने तो आपल्या काकांकडे जाब विचारण्यासाठी गेला मात्र वाद होऊ नये म्हणून तो लागलीच आपल्या घरी परतला परंतु लगेच प्रवीण पाटील यांच्या पाठीमागून काका संजय विक्रम पाटील, काकु मंगला संजय पाटील, कार्तिक संजय पाटील व हेमंत संजय पाटील हे येऊन शिवीगाळ करायला लागले व कार्तिक यांनी त्यांच्या हातातील काठीने प्रवीण पाटील यांना मारहाण केली तसेच संजय पाटील व हेमंत पाटील यांनी त्यांच्या हातातील काठीने डाव्या खांद्यावर व पाठीवर जबर मारहाण केली. यात प्रवीण पाटील यांना गंभीर दुखापत झाली. हा प्रकार शनिवार, 27 नोव्हेंबर रोजी 8.30 वाजेच्या सुमारास घडला. तत्पूर्वी प्रवीण यांनी आरडाओरड केली असता वडील राजेंद्र पाटील व आई सुरेखा पाटील धावून आले परंतु त्यांनाही चापट-बुक्क्यांनी व लाथांनी मारहाण केली. यात प्रवीण याला गंभीर दुखापती झाल्याने त्याला उपचाराकामी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस स्थानकात वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 325, 394, 452 व 427 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहा.निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
