नशिराबाद महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू : दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
जळगाव : विरूद्ध दिशेच्या येणार्या भरधाव दुचाकीस्वाराने समोरून आलेल्या दुचाकीला दिलेल्या नशिराबाद येथील महिला गंभीर जखमी झाली होती. उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नशिराबाद- भुसावळ महामार्गावरील माऊली पेट्रोल पंपाजवळ हा अपघात शनिवारी घडला होता.
अपघातात महिलेचा मृत्यू
नशिराबाद-भुसावळ दरम्यान इकबाल शहा सांडू (45, रा.मोमीन मोहल्ला, नशिराबाद) हे त्यांची पत्नी सरताजबी इकबाल शहा (42) यांच्यासह शनिवार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.यू.3558) ने नशिराबादकडून भुसावळकडे जात असताना समोरून राँग साईडने अनोळखी नंबरवरील दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली. या अपघातात सरताजबी शहा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास हवालदार गजानन देशमुख करीत आहे.


