भडगाव नगरपरीषदेत पाच लाख 70 हजारांचा अपहार

मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांचा पत्रकार परीषदेत आरोप : सखोल चौकशी मागणी


भडगाव : भडगाव नगरपरीषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी, प्रशासकसह कर्मचारी यांनी संगनमताने शासनाने बंदी केलेले किटकनाशक नाशिक येथील दीपक लॅब यांच्याकडून खरेदी पाच लाख 70 हजार रूपयांचा अपहार केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी पत्रकार परीषदेत केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अपहार करण्यात आल्याचा आरोप
कोरोना सुरूवातीला पंतप्रधान यांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. कोरोना काळात भडगाव नगरपरीषदने 24 जानेवारी 2020 च्या ठरावानुसार आरोग्य विभागसाठी जंतुनाशके औषध-पावडर घेण्यासाठी निविदा मागवुन त्यातील दिपक लब नांदगाव यांना टेंडर देण्यात आले. दीपक लॅब यांना मिळालेल्या आदेशनुसार त्यांनी लॉरवास मास्किटो आईल किंवा तत्सम 1 हजार लिटर, डीडीव्हीपी 76 टक्के ईसी 500 लिटर, इडोपावडर डस्ट 5 टक्के 2 हजार किलो, सेंटेड फिनाईल एक हजार लिटर या साहित्याचे संबंधित दीपक लॅबला 1 मे 2020 ला नगरपरीषदेने 11 लाख 22 हजार रुपये त्यात शासकीय कपात करुन 9 लाख 87 हजार 360 रुपये अदा केले आहे. तर दुसर्‍या टप्प्यात पुन्हा लॉरवास मॉस्किटो आईल किंवा तत्सम 500 लिटर, 2) डीडीव्हीपी 76 टक्के ईसी 500 लिटर, इडोपावडर डस्ट 5 टक्के 2 हजार किलो खरेदी करत 16 मार्च 2021 रोजी त्याचे बिल नऊ लाख 48 हजार 500 रुपये शासकीय कपात करीत आठ लाख 34 हजार 680 रुपये दिपक लॅब यांना अदा केले आहे. हे खरेदी करताना डीडीव्हीपी 76 टक्के ईसीचा दर 1390 प्रती लिटर निश्चित करण्यात आला आहे. मात्र डीडीव्हीपी 76 टक्के ईसीचा दर निविदापुर्वी 820 प्रती लिटर असा होता. असे असताना जास्तीची किंमत दाखवुन संगनमताने दिपक लॅब नांदगाव यांना टेंडर देण्यात आले. तसेच केंद्र शासनाने 8 ऑगस्ट 2018 च्या परीपत्रकनुसार 18 कीटकनाशकावर बंदी घातली आहे. त्यात डीडीव्हीपी 76 टक्के ईसीचा समावेश असुन याची माहिती असताना त्याचा वापर करुन नगरपरीषद हद्दीत राहणार्‍या नागरीकांच्या आरोग्याशी खेळत जीव धोक्यात घातला आहे.






पाच लाच 70 हजारांचा अपहार केल्याचा आरोप
डीडीव्हीपी 76 टक्के ईसीची बंदी पुर्वीची किंमत 820 प्रती लिटर रुपये असताना मात्र 1320 रुपये प्रती लिटर खरेदी करुन प्रतीलिटर 570/- रुपये जादा दराने खरेदी दाखवुन 5 लाख 70 हजार रुपयाचा संगनमाने अपहार केला आहे, असा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी पत्रकार परीषदेत करत दोषींविरुध्द योग्य ती चौकशी करुन तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबतची तक्रार अनिल वाघ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याकडे देखील केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !