भुसावळसह रावेरला रविवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी


भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 21 वी 19 वर्षातील (जुनियर) गटातील मुला/मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा रत्नागिरी येथे 16 ते 18 डिसेंबर 2021 दरम्यान होणार आहे़. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार, 5 रोजी सकाळी 11 वाजतातर दुपारी 2 वाजता रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूलच्या मैदानावर सरदार जी.जी.स्पोर्ट्स क्लबतर्फे होणार आहे. 1 जानेवारी 2003 नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, युवराज माळी, जे.के.पाटील, प्रतीक कुलकर्णी, अजय महाजन, प्रतीक खाराले, विकास पाटील, तारेख अहमद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !