अंतुर्ली शिवारातील शेतकर्‍यांच्या शेती साहित्यावर चोरट्यांचा डल्ला


मुक्ताईनगर : अंतुर्ली शिवारातील शेतकर्‍याच्या पत्री शेडमधून चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीचे शेती साहित्य लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या परीसरात भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ इच्छापूर ते बर्‍हाणपूर महामार्गालगतच्या अंतुर्ली शिवारात गणेश लक्ष्मण तराळ यांचे शेत गट नंबर 465 मध्ये लाल बावडी येथे पत्री शेड असून या शेडमध्ये ठेवण्यात आलेली शेती अवजारे वस्तू चोरट्यांनी लांबवल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. सुमारे पंचवीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात आले. अंतुली दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. दरम्यान, अंतुर्ली गावासह परीसररात देखील अवैधधंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या संदर्भातही पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !