यावल तालुक्यात महिला शिपायाचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करणार्या 33 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 32 वर्षीय संशयीताविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यातील रहिवासी असलेली 33 वर्षीय विवाहिता ही तालुक्यातील एका आरोग्य केंद्रावर शिपाई पदावर आहेत. गुरूवार, 2 डिसेंबर रोजी दिवसभर काम आटोपून महिला शिपाई यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करणार्या संशयीत आरोपी मिलिंद साहेबराव जंजाळे (32) यास दवाखान्याची चावी दिली मात्र यावेळी संशयीताने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिला शिपाईने रात्री 8.30 वाजता यावल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने यावल पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी मिलिंद जंजाळे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.
