50 हजारांसाठी जळगावच्या विवाहितेचा छळ
एमआयडीसी पोलिसात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने शहरातील अयोध्यानगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने या प्रकरणी गुरुवार, 2 रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी सोयगावातील पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
50 हजार रुपये न आणल्याने
शहरातील अयोध्यानगर येथील माहेर असलेल्या ज्योतीबाई संतोष गाडेकर (30) यांचा विवाह संतोष दत्तू गाडेकर (रा.सोयगाव, ता.औरंगाबाद) यांच्याशी रीतीरीवाजानुसार 2009 मध्ये झाला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती संतोष गाडेकर यांनी लहान लहान कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर माहेरहून 50 हजार रूपये आणावे यांसाठी शारीरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. यासाठी सासरे, जेठाणी आणि दिराणी यांनी देखील गांजपाठ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत ज्योतीबाई गाडेकर यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून पतीसह सासरच्यांविरोधात गुरूवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी तक्रार दिली. त्यांच्या तक्रवारून पती संतोष दत्तू गाडेकर, सासरे दत्तू लक्ष्मण गाडेकर, जेठाणी सीमा संजय गाडेकर आणि दीराणी ललिता विष्णू गाडेकर (सर्व रा.सोयगाव, ता.औरंगाबाद) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अतुल पाटील करीत आहे.





