लग्नाच्या आमिषाने जळगावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तरुणाविरोधात गुन्हा


जळगाव : अल्पवयीन 17 वर्षीय पीडीतेला लग्नाचे आमिष दाखवत एरंडोल शहरातील तरुणाने अत्याचार केला मात्र लग्न न करता तरुणीची फसवणूक केली शिवाय तरुणीचा विवाह झाल्यानंतर तरुणीच्या पतीला प्रेमसंबंधाची माहिती देवून घटस्फोट देण्यास भाग पाडले. या प्रकरणी 17 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन संशयीत आरोपी हसन असलम मोमीन (एरंडोल, जि.जळगाव) याच्याविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमसंबंधाची माहिती दिल्याने तरुणीचा घटस्फोट
जळगाव शहरातील एका भागात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडीलांसह वास्तव्यास असून तीन वर्षापूर्वी मुलीचे कुटुंबीय एरंडोल येथे वास्तव्यास होते तर सुमारे दोन वर्षांपूर्वी संशयीत आरोपी हसन असलम मोमीन (एरंडोल, जि.जळगाव) याच्याशी अल्पवयीन तरुणीची ओळख निर्माण झाल्याने त्याने तरुणीला लग्नाची मागणी घालण्यात आली मात्र आरोपीच्या घरच्यांनी परवानगी दिली नाही. आई-वडीलांची आपण समजूत काढू, त्यासाठी दोन वर्ष थांबावे लागेल, असे संशयीताने सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई-वडीलांनी मुलीचे सुरत येथील मुलाशी लग्न लावून दिले. त्यावेळी मुलीचे वय कमी असल्याने मुलगी आई-वडीलांकडे सज्ञान होईपर्यंत वास्तव्यास होती. या काळात संशयीत हसनने मुलीच्या पतीला प्रेमसंबंधाची माहिती दिल्याने पीडीत मुलीशी सुरत येथील पतीने घटस्फोट दिला. हा प्रकार घडल्यानंतर मुलीच्या आई-वडीलांनी हसनला घरी बोलावून लग्न करण्याबाबत विचारले असता आरोपीने स्पष्ट नकार दिला.






वेळोवेळी अत्याचाराचा आरोप
दरम्यान, संशयीत हसनने 24 एप्रिल 2020 रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केला. मुलीने लग्न करण्याचे सांगितले असता लग्नाला नकार देण्यात आला. या प्रकाराला कंटाळून शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी पीडीत मुलीने जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी हसन असलम मोमीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अरुण सोनार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !