जळगावात वृद्धाला 63 हजारांचा ऑनलाईन गंडा

क्रेडीटसाठीचे चार्ज कमी करण्याच्या बहाण्याने एमआयडीसीतील प्रौढाची फसवणूक


जळगाव : मी स्टेट बँकेतून बोलत असून तुम्हाला लागणारी ऍन्युअल फि माफ करायची असेल तर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, ओटीपी सांगताच त्या इसमाची 63 हजारात फसवणूक झाल्याची घटना शनिवार 4 डिसेंबर रोजी आली आहे. याप्रकरणी फसवणूक करणार्‍या तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
शहरातील एमआयडीसी परीसरातील रहिवासी शिवकुमार रामसुंधर तिवारी (45) हे खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे दोन के्रडीट कार्ड आहेत. हे कार्ड वारण्यासाठी त्यांना वार्षीक फि लागत असल्याने त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी कस्टमर केअरला कॉल करुन ही फि कमी लागावी यासाठी विनंती केली होती. त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.52 वाजेच्या सुमारास तिवारी यांना महिलेचा कॉल आला. त्यांनी मैं स्टेट बँक ऑफ इंडिया के्रडीट कार्ड से बात कर रही हूँ.. आपको ऍन्यूअल फि माफ चाहीए तो मैने आपको ओटीपी भेजा है.. वह ओटीपी मुझे बतो दो असे तीने तिवारींना सांगितले. दरम्यान तिवारी यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्या महिलेला सांगितला. त्यानंतर काही वेळातच तिवारी यांच्या दोन्ही कार्डमधून सुमारे 63 हजार रुपये कपात झाल्याचा त्यांना मॅसेज आला.






एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
क्रेडीट कार्डमधून पैसे कपात झाल्यानंतर कस्टमर केअरमधील त्या महिलेचा तिवारी यांना कॉल आला. तुमच्या क्रेडीट कार्डचा फ्रॉड झाला असून ते कार्ड मी बंद केले आहेत, असे म्हणून त्या महिलेने कॉल कट केला. तिवारी यांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तात्काळ बँकेच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवार, 4 रोजी एमआयडीसी पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !