जळगाव विद्यापीठ परीसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीसरात दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन घडत असून विद्यापीठाचे डेप्युटी इंजिनिअर राजेश पाटील यांना रविवारी 5.30 वाजता हनुमान खोरे परीसरात हा बिबट्या दिसला. विद्यापीठ परीसरात गेल्या वर्षी बिबट्याची मादी व दोन पिलांचा वावर होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी, एरंडोल वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावले होते. सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या. वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली होती. विद्यापीठाच्या आवारात पूर्वीपासूनच वृक्षांची घनता जपली गेल्याने पोषक नैसर्गिक अधिवास निर्माण झाला आहे. लंगूर माकड, रानडुक्कर, तडस, हरीण प्रजाती, नीलगाय, उदमांजर, ससे, कोल्हे असे वन्यप्राणी आढळतात. सुरक्षित अधिवास आणि मुबलक भक्ष्य मिळत असल्याने या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.
