शेती वादातून हाणामारी : एक जण जखमी : भोकरची घटना
जळगाव : तालुक्यातील भोकर येथे शेतीच्या वादातून शनिवार, 4 डिसेंबर रोजी दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला. याप्रकरणी सोमवार, 6 डिसेंबर रोजी चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील भोकर येथे सुकलाल पंडीत सोनवणे (42) हे वास्तव्यास आहेत. सुकलाल सोनवणे हे शेती करतात. त्यांचा गावातीलच बाळू रामकृष्ण सोनवणे यांच्यासोबत शेतीचा वाद आहे. या वादावरुन शनिवार, 4 डिसेंबर रोजी सुकलाल सोनवणे यांच्याकडे बाळू रामकृष्ण सोनवणे यांच्यासह इतर तीन जण आले. त्या सर्वांनी सुकलाल सोनवणे यांना उद्देशून तुम्हाला जास्तीचे शेत पाहिजे आहे का? असे म्हणत लाथा-बुक्क्यांंनी मारहाण केली. या दरम्यान बाळू सोनवणे याने सुकलाल सोनवणे यांना कुर्हाडीच्या दांडक्याने डोळ्याजवळ व पाठीवर मारहाण केली. याचवेळी सुकलाल सोनवणे यांचा मुलगा सागर याला सुध्दा चौघांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुकलाल सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार, 6 डिसेंबर रोजी जळगाव तालुका पोलिसात बाळू रामकृष्ण सोनवणे, विनोद बाळू सोनवणे, ईश्वर बाळू सोनवणे व रामकृष्ण बाळू सोनवणे (सर्व रा.भोकर) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील हे करीत आहेत.





