कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी खून प्रकरण : कारागृहात सहा संशयितांची ओळखपरेड


जळगाव : फरकांडे येथील कापूस कापूस व्यापारी स्वप्निल शिंपी यांच्या खून प्रकरणात सहा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर सर्व सहा संशयितांची सोमवारी कारागृहात तहसीलदारांच्या समक्ष ओळखपरेड घेण्यात आली. या गुन्ह्याचे फिर्यादी दिलीप चौधरी हे एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्यांच्याकडून ओळखपरेड करवून घेण्यात आली आहे. या संदर्भातील गोपनीय अहवाल सोमवारी सायंकाळी धरणगाव पोलिस ठाण्यात पाठवण्यात आला.

या आरोपींना झाली अटक
नटवर किशोर जाधव (39, रा.अमळनेर), कुणाल उर्फ बंटी सदाशीव वाणी (40, रा.चौगुले प्लॉट), विकास राजू सारवान (32, रा.गुरू नानकनगर), अंकुश किसन गवळी (36, रा.गवळीवाडा), सनी धर्मराज पवार (23, रा.गुरू नानकनगर) व अशोक प्रजापती (39, रा.प्रजापतनगर) या सहा संशयिीतांना अटक करण्यात आली आहे. यातील नटवर हा पोलिस कर्मचारी आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांची ओळखपरेड घेण्यासाठी सुरुवातीला न्यायालयीन कोठडी घेण्यात आली होती.






खूनातील मास्टरमाईंड नटवरच
कापूस व्यापारी शिंपी यांना लुटण्याच्या नियोजनाचा मास्टरमाइंड संशयीत पोलिस कर्मचारी नटवरच असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. तर इतर पाचदेखील सराईत गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !