धरणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार


धरणगाव : धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 14 वर्षीय मुलीवर रात्री अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाविरोधात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या वडीलांचे निधन झाले आहे. सोमवार, 6 डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री 8 वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री 9 वाजता पीडीत मुलगी लघू शंकेसाठी उठली असता त्यांच्या गल्लीतील संशयीत आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दुसरीकडे रात्री 10 वाजता अल्पवयीन जागेवर नसल्याचे आई चितेंत होती. मध्यरात्री 12.30 वाजता अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी मंगळवार, 7 डिसेंबर रोजी सायंकाळी धरणगाव पोलिस ठाण्यात पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी योगेश दिनकर कोळी याच्याविरोधात लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत धरणगाव पोलिस ठाण्यात मंगळवार, 7 डिसेंबर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी हा पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !