जळगावात दोन गटात हाणामारी ; सात संशयीतांविरोधात गुन्हा


जळगाव : जळगावात दोन गटात हाणामारी ; सात संशयीतांविरोधात गुन्हा शहरातील मोहाडी रोडवर मध्यरात्री दीड जेच्या सुमारास दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोन्ही गटातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सार्वजनिक शांततेचा केला भंग
शहरातील मोहाडी रोड परीसरात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीची गस्त घालत असतांना हॉटेल मराठा गार्डनसमोर दोन गटात वाद घालून झोंबाझोंबी करीत होते. यावेळी दोन्ही गटांकडून जोरजोरात आरडाओरड करुन व शिवीगाळ करीत शांतता भंग करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले.






यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटातील बापू संतोष सपकाळे (41), मयूर राजाराम कुर्‍हाडे (31, दोघे रा.वाघनगर), दिगंबर पुंडलिक पोहरे (57, रा.समता नगर), शशिकांत प्रकाश राजपूत (29, रा.हॉटेल मराठा गार्डन), रवींद्र गणपत मराठे (47), संजय गणपत मराठे (46), संदीप पांडुरंग माळी (46, तिघे रा.नेहरुनगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !